शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​महाराष्ट्राचे जागतिक स्तरावर कौतुक; गाठणार १ लाख कोटी डॉलरचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:15 IST

मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात अर्थव्यवस्थेवर दाखवला विश्वास, देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आणि स्थिर नेतृत्व यामुळे राज्य आर्थिक विकासाचा एकेक टप्पा गाठत आहे, गुंतवणूकही वाढली.

मुंबई : महाराष्ट्राच्या दमदार वाटचालीचे कौतुक करताना ‘मॉर्गन स्टॅन्ले’ या जागतिक वित्तीय सेवा पुरविणाऱ्या नामवंत संस्थेने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० मध्ये एक लाख कोटी डॉलरचे (एक ट्रिलियन डॉलर) लक्ष्य गाठेल, असा विश्वास आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचा उच्च साक्षरतेचा दर, आर्थिक शिस्त, मोठ्या प्रमाणात होणारी देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आणि स्थिर नेतृत्व यामुळे राज्य आर्थिक विकासाचा एकेक टप्पा गाठत असल्याचे प्रशस्तिपत्रही अहवालात देण्यात आले आहे. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्राबरोबरच उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर लक्ष्य केंद्रित केले. वाढत्या औद्योगिकीकरणावर भर देत या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. धातू, वाहन, अन्नप्रक्रिया, पेट्रोलियम आणि यंत्रसामग्री उद्योगात जाणीवपूर्वक गुंतवणूक वाढ केली गेली, असेही अहवालात म्हटले आहे. ‘महाराष्ट्र - लिडिंग द वे’ या शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मॉर्गन स्टॅन्लेसारख्या नामवंत संस्थेने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख मांडला, ही आमच्यासाठी आनंदाची आणि प्रेरणा देणारी बाब आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, समाजाचे व्यापक कल्याण, निर्यात, धोरण सुधारणांच्या मार्गावर आमची घोडदौड सुरूच राहील.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन

२०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात १९.६ अब्ज डॉलरची म्हणजे १.६० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनाच्या १७ टक्के वाटा महाराष्ट्राचा, वाहनांचे निर्मिती आणि सुट्या भागांच्या उत्पादनात हा वाटा २० टक्के आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे, असे अहवालात म्हटले आहे.

५३६ अब्ज डॉलर एवढा सध्या महाराष्ट्राचा जीडीपी (सकल राज्यांतर्गत उत्पादन) असून, तो जगातील २८ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या सिंगापूरच्या जीडीपीच्या बरोबरीचा आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाव्याला दुजोरा

महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात अव्वल असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकडेवारीसह सातत्याने करत असतात. या दाव्याला मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात दुजोरा देण्यात आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ३९ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली. महाराष्ट्र पायाभूत सुविधांचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारत असल्याचा उल्लेखही अहवालात आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, समृद्धी महामार्गा या प्रकल्पांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर गती मिळणार आहे. सक्षम नेतृत्वाअंतर्गत होत असलेल्या या घडामोडींमुळे गुंतवणूकदेखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र