शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

महाराष्ट्र हॉकी लीग : मेट्रोकडून रोव्हर्सचा ११-०ने धुव्वा

By admin | Updated: September 3, 2016 21:12 IST

सुरेंद्र आनंद स्मृति महाराष्ट्र हॉकी लीगमध्ये मेट्रो स्पोर्ट्स क्लबने शनिवारी धडाकेबाज विजयाची नोंद करताना रोव्हर्स अकादमीचा ११-०ने धुव्वा उडवला.

- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - सुरेंद्र आनंद स्मृति महाराष्ट्र हॉकी लीगमध्ये मेट्रो स्पोर्ट्स क्लबने शनिवारी धडाकेबाज विजयाची नोंद करताना रोव्हर्स अकादमीचा ११-०ने धुव्वा उडवला. 
 
पिंपरी येथील नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मेट्रो स्पोर्ट्स क्लबने रोव्हर्स अकादमीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. जेम्स परमारने सर्वाधिक ४ गोल (१९, २०, ३९, ४२वे मिनिट) करीत रोव्हर्सचा बचाव खिळखिळा केला. चिन्मय कोरडने २, तर मुकेश बिरांजे, मुसा तोरगल, गुफरान तोरगल, ए. सय्यद आणि अमित राजपूत यांनी प्रत्येकी १ गोल करीत चिन्मयला चांगली साथ दिली. विजयी संघ पूर्वार्धात ५-०ने आघाडीवर होता.
 
दुसऱ्या सामन्यात हॉकी लव्हर्सने सीवायबी संघावर ५-१ने विजय मिळवला. हॉकी लव्हर्सतर्फे आकाश बिलितकर, कौस्तुभ आंबेकर, मयूर जाधव, स्वप्नील गरसूंड, प्रणय गरसूंड यांनी प्रत्येकी १ गोल करीत विजयात मोलाचे योगदान दिले. सीवायबीतर्फे सिल्वराज पिल्ले यालाच एकमेव गोल करता आला. आकाश बेलितकर आणि प्रणय गरसूंड यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि २२व्या मिनिटाला गोल करीत आपल्या संघाला पूर्वार्धात २-०ने आघाडी मिळवून दिली होती. 
 
उत्तरार्धातही हॉकी लव्हर्सच्या खेळाडूंनी सीआयबी संघावर दबाव कायम ठेवत ३२ व ३८व्या मिनिटांना गोल करीत आघाडी ४-०ने वाढवली. ४१व्या मिनिटाला सेल्वराजने सीवायबीचे खाते उघडले. ४४व्या मिनिटाला स्वप्नील गरसूंडने गोल करीत हॉकी लव्हर्सच्या विजयाचे अंतर वाढवले. रविवारी दुपारी ४ वाजता सेंट्रल रेल्वे विरुद्ध एअर फोर्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे.
 
निकाल : 
मेट्रो स्पोर्ट्स क्लब : ११ (जेम्स परमार ४, चिन्मय कोराड २, मुकेश बिरांजे १, मुसा तोरगल १, गुफरान तोरगल, ए. सय्यद १, अमित राजपूत १) विवि रोव्हर्स अकादमी : ०. 
हॉकी लव्हर्स : ५ (आकाश बेलितकर, कौस्तुभ आंबेकर १, मयूर जाधव १, स्वप्नील गरसूंड १, प्रणय गरसुंड १) विवि सीवायबी : १ (सेल्वराज पिल्ले).