मुंबई - उत्तर महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उष्ण वारे वाहू लागले असून, त्यांचा विपरीत परिणाम म्हणून अवघा महाराष्ट्र तापला आहे. पुढील आठवडाभर संपूर्ण राज्याची होरपळ होईल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढील चार आठवडे अधिक उष्णतेचे असतील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
अकोल्याचे शनिवारचे (दि. ११) कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मुंबईसह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तापमानात वाढ झाली. हवामानात जलद बदल होऊन उत्तर महाराष्ट्रावर उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी उष्ण वारे मुंबईसह राज्यभर वाहत आहेत, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवडा अधिक तापदायक राहील. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशांवर जाईल, तर महामुंबईत कमाल तापमान ३८ अंशांवर नोंदविले जाईल.- अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
Web Summary : Maharashtra experiences soaring temperatures due to high pressure. Akola hits 42°C. Mumbai, Marathwada, Vidarbha also see a rise. The heatwave will persist for four weeks, with Mumbai reaching 35°C.
Web Summary : उच्च दबाव के कारण महाराष्ट्र में तापमान बढ़ रहा है। अकोला में 42 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। मुंबई, मराठवाड़ा, विदर्भ में भी गर्मी बढ़ी। चार सप्ताह तक लू चलेगी, मुंबई 35 डिग्री सेल्सियस तक पहुंचेगा।