शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत तब्बल ५५ वाघ आणि २६३ बिबट्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 04:38 IST

मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला असून, यात वन्यजीवच नव्हे, तर माणसांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. या संघर्षात माणसे बळी पडत असताना प्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे.

- दयानंद पाईकरावनागपूर - मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला असून, यात वन्यजीवच नव्हे, तर माणसांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. या संघर्षात माणसे बळी पडत असताना प्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे. मागील तीन वर्षांत राज्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात १४४ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे, तर ५५ वाघ, २६३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.देशात सर्वाधिक वाघमहाराष्ट्रात आहेत. शिकाऱ्यांचा धुमाकूळ आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष यामध्ये वाघांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. या राष्ट्रीय प्राण्याला वाचविण्यासाठी व्यापक उपाययोजना, तसेच अभियान राबविण्यात आले. वन विभागाने अनेक प्रकारच्या उपाययोजना राबविल्या. सामाजिक संस्था, वन्यजीवप्रेमींनी व्यापर जनजागृती अभियान राबवित वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला.याचे सकारात्मक परिणामही गेल्या काही काळात दिसून आले. असे असले, तरी वाढत्या शहरीकरणामुळे जंगल क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. यामुळे प्राण्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. पर्यायाने जंगलातील हे प्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. शिवाय पाण्याचा अभाव आणि अन्नाच्या शोधात त्यांचा कल गावांकडे वळला आहे. पूर्वी त्यांच्या भ्रमण मार्गात नागरी वस्ती नसायची. आज मात्र ती परिस्थिती दिसत नाही. साहजिकच यातून मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होऊन वन्यजीव आणि मानवाच्या जीवितावर बेतण्याचे प्रसंग वाढले आहेत. अशा असमतोल परिस्थितीमुळे वाघ वाचविण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचा बळी जात आहे. मागील तीन वर्षांत त्यामुळेच ५५ वाघांचा मृत्यू झाला आहे. हा शासकीय आकडाही धक्कादायक आहे. वाघाशिवाय इतर प्राण्यांचाही हा संघर्ष बेतत आहे.तीन वर्षांत २६३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काळवीट, चौसिंग, रानगवे, मोर, अस्वल आदी प्राण्यांनाही जीव गमवावा लागत आहे. प्राणीच नव्हे, तर माणसांनाही जीव गमवावा लागला असून, १४४ नागरिक प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. याशिवाय तीन वर्षांत शेतात शिरलेल्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.याशिवाय तीन वर्षांत शेतात शिरलेल्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मागील तीन वर्षांत २०१६ मध्ये १४ वाघ, २०१७ मध्ये २२ वाघ आणि २०१८ मध्ये १९ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये ८९ बिबट, २०१७ मध्ये ८६ बिबट आणि २०१८ मध्ये ८८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये ५७ व्यक्ती, २०१७ मध्ये ५४ व्यक्ती आणि २०१८ मध्ये ३३ व्यक्तींना आपला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक माहिती आहे.वन कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच शीघ्र बचाव पथकाची निर्मिती ठिकठिकाणी करण्यात आली आहे. वन विभागातील साधनसामुग्री अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. -नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र