शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिरवागार महाराष्ट्र! जंगल क्षेत्रात २० चौरस किलोमीटरनं वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 07:27 IST

मुंबई शहराचा विचार करता येथील जंगल १११ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो.

मुंबई : देशातील सर्वात पाचवे मोठे जंगल महाराष्ट्रात आहे. हे जंगल २० चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्यभरातील जंगल ५० हजार ७९८ चौरस किलोमीटरवर पसरले आहे. मुंबई शहराचा विचार करता येथील जंगल १११ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. गेल्या दहा वर्षांत मुंबईतल्या जंगलात ९ टक्के एवढी वाढ नोंदविली आहे. तत्पूर्वी ते १०२ चौरस किलोमीटरवर पसरलेले होते.२०२१ च्या सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढराज्यभरातील विविध प्रकल्पांसह अनेक कारणांमुळे जंगल नष्ट होत असल्याची भीती व्यक्त    करण्यात आली असतानाच  २०२१ च्या वन सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढ झाल्याचे दाखले देण्यात आले आहेत. देशातील बहुतांश राज्यातील वनात वाढ नोंदविण्यात येत असतानाच बहुतांशी राज्यांनी आपले वनक्षेत्र विविध माध्यमातून टिकवून ठेवले आहे. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.वृक्ष संपत्तीचे मूल्यांकनासाठी अहवालपर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ या अहवालाचे प्रकाशन केले.देशातील वन आणि वृक्ष संपत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.९ दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र  देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या २४.६२ टक्के आहे.२०१९ च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन  आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये २,२६१ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. सध्या केलेल्या मूल्यांकनातून १७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित आहे.खारफुटीचे आच्छादनएकूण क्षेत्र ४,९९२ चौरस किमी आहे.२०१९ च्या  मूल्यांकनाच्या तुलनेत खारफुटीच्या आच्छादन क्षेत्रात १७ चौरस किमीची वाढ झाली आहे.ओरिसा ( ८ चौरस किमी ) त्यानंतर महाराष्ट्र (४ चौरस किमी) आणि कर्नाटक ( ३ चौरस किमी) ही खारफुटीच्या आच्छादनामध्ये वाढ दर्शवणारी पहिली तीन राज्य आहेत.