सांगली : शक्ती आणि युक्तीचे समीकरण जमवीत महाराष्ट्र आणि हरियाणा संघाने राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रात्री उशिरापर्यंत विद्युतझोतात अंतिम फेरीचा सामना सुरू होता. जिल्हा रस्सीखेच असो.तर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये या स्पर्धा सुरू आहेत. आज दिवसभर १७ वर्षे गटात जोरदार लढती झाल्या. ४०० किलो गटात दिल्ली, केरळ, पंजाब व मध्य प्रदेशने मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला. ४२० किलोत हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली व कर्नाटक संघाने आपली ताकत दाखवीत आघाडी घेतली. महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा असा अंतिम सामना रंगला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने तगडी ‘रस्सीखेच’ झाली. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि जल्लोषाच्या साथीनं रात्री उशिरापर्यंत विद्युत झोतात हा सामना सुरू होता. नगरसेविका आशा शिंदे व राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक शेट्टी यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. तांत्रिकी समितीचे सचिव डॉ. सुहास व्हटकर यांनी स्वागत केले. यावेळी भारतीय रस्सीखेच महासंघाच्या सरचिटणीस माधवी पाटील, मदन मोहन, नितीन शिंदे, संजय ओतारी, जे़ ए़ गुपिले, राजेंद्र कदम, अनिल माने, आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)
महाराष्ट्र, हरियाणाची अंतिम फेरीत धडक
By admin | Updated: November 25, 2014 00:08 IST