शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 21:06 IST

मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी सरकारची चौकशी नको तर कारवाई हवी- विजय वड्डेटीवार यांची मागणी

जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली इथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, हा सरकारचा क्रूरपणा आहे.आधी फडणवीस सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले.महायुती सरकार आल्यावरदेखील नुसत्या बैठका झाल्या, पण कारवाई झालीच नाही. मतांसाठी मराठा समाजाची फसवणूक या सरकारने केली, हे मराठा समाज विसरणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली.

याआधी राज्यात मराठा समजाचे पाच - दहा लाखांचे मोर्चे निघाले, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नव्हती. आताच का मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज करण्यात आला? मराठा आरक्षण देऊ शकत नाही हे माहीत असल्यामुळेच महायुती सरकार हे आंदोलन चिरडत आहे, अशी टीकाही वड्डेटीवारांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, दीड वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर महायुती सरकारने काहीच केले नाही, त्यामुळे आज समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. पण त्याही आंदोलनात लाठीचार्ज करून सरकारने त्यांची मराठा आरक्षण प्रती आपली नियत दाखवली. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे, अस असताना आंदोलनकर्त्यांनावर बळाचा अती वापर  झाल्याचे दिसत आहे. आंदोलनकर्त्यांना जखमी करणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे. या आंदोलनकर्त्यांनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले हे ही सरकारने स्पष्ट केले पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली, पण अश्या अनेक चौकश्या होतात. नवी मुंबई महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरणी पण चौकशीची घोषणा झाली पुढे झाले काहीच नाही. त्यामुळे जालना प्रकरणी देखील चौकशी नको कारवाई हवी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इंद्रा सहानी प्रकरणातील ५० टकके आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी लागेल. त्याशिवाय आरक्षण देता येणार नाही हे आता स्पष्ट आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही याबाबत धोरणात्मक निर्णय होत नाही यातून सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित होते असेही विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा