शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 08:43 IST

मोदींच्या वाढदिवसाला सुरुवात, महात्मा गांधी जयंतीला समारोप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजीचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची २ ऑक्टोबरची जयंती या दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या कालावधीत नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा नंतरच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र,  विभागांचे स्वत:चे पोर्टल अशा वेबपोर्टलवर १० सप्टेंबरपर्यंत प्राप्त तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रलंबित प्रकरणांपैकी कितीचा निपटारा झाला आणि निपटारा न झालेल्या प्रकरणांविषयी अहवाल १० ऑक्टोबरपर्यंत अधिकाऱ्यांना सरकारला सादर करावा लागणार आहे.  

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरणतांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थींना लाभ देणेफेरफार नोंदीचा निपटारा, शिधापत्रिकांचे वितरणविवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणेनव्याने नळजोडणीमालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणेप्रलंबित घरगुती वीजजोडणीस मंजुरीबिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या  लाभार्थींची ऑनलाइन नोंदणीअनुसूचित जमातीच्या लाभार्थींची प्रलंबित वनहक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून)दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र देणे.

प्रदेश काँग्रेसची टीकासेवाच करायची तर गांधी सप्ताह पाळणे सयुक्तिक ठरले असते. वाढदिवस साजरा करण्यासाठी महात्मा गांधींशी संबंध जोडणे म्हणजे माहात्म्याचे कार्य कमी लेखणे होय. त्यापेक्षा राज्य सरकारने ‘सत्ता पंधरवडा’ असे नाव द्यायला हवे होते, अशी बोचरी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी