शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महाराष्ट्रामध्ये येणार तब्बल १६ हजार कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 06:40 IST

बारा देशांतील उद्योगपतींशी केले करार

मुंबई : एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.उद्योग विभागातर्फे मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० (भाग दोन) चा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार ऑनलाइन उपस्थित होते.अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांशी  १६ हजार ३० कोटींचे सामंजस्य करार यात झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. वर्ल्ड असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या.४० हजार हेक्टर जमीन राखीवउद्योगांसाठी राज्यात सुमारे ४० हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. विविध परवान्यांऐवजी आता ४८ तासांत महापरवाना दिला जाईल आणि औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाईल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिलीया कंपन्यांची गंतुवणूकएक्सॉन मोबिल (अमेरिका) ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड : ७६० कोटी, हेंगली (चीन) इंजिनिअरिंग - तळेगाव टप्पा क्रमांक-२, पुणे : २५० कोटी आणि १५० रोजगार, असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक - चाकण, तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे : ५६० कोटी, वरूण बेवरेजेस (भारत) अन्न प्रक्रिया - सुपा, अहमदनगर : ८२० कोटी, हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक - भिवंडी- चाकण तळेगाव : १५० कोटी आणि २५०० रोजगार, असेट्ज (सिंगापूर) डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे : ११०० कोटी व २०० रोजगार, इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन - रांजणगाव, पुणे : १२० कोटी आणि ११०० रोजगार, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन जेव्ही विथ फोटोन (चीन) आॅटो-तळेगाव : १००० कोटी रोजगार १५००, इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड : १५०० कोटी आणि रोजगार २५००, रॅकबँक (सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजवडी, पुणे : १५०० कोटी, यूपीएल (भारत) केमिकल - शहापूर, रायगड : ५००० कोटी आणि रोजगार ३००० कोटी, ग्रेट वॉल मोटर्स (चीन) आॅटोमोबाइल तळेगाव- पुणे : ३७७० कोटी आणि २०४२ रोजगार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे