शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

By अतुल कुलकर्णी | Updated: November 13, 2019 05:30 IST

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या या याचिकेला बळ मिळावे म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे दोन दिवसाची मुदतवाढ मागितली, अशी माहिती समोर आली आहे.राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र तशी तयारी दर्शविलेल्या पक्षांना त्यांनी वेळ वाढवून दिला नाही, असा युक्तीवाद न्यायालयात करता यावा यासाठी राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री साडेआठची मुदत संपण्याच्या आतच राज्यपालांना पत्र देऊन दोन दिवस वाढवून मागितले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची मागणीही राज्यपालांनी फेटाळली व राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली.भाजपला महाराष्ट्रात भाजपशिवाय अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार नको आहे, त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई केली, असा शिवसेनेचा दावा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील राज्यपालांनी शेवटचा पर्याय म्हणून काँग्रेसला ही विचारणा करायला हवी होती. काँग्रेसलाही वेळ द्यायला पाहिजे होता, पण तो दिला नाही अशी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळी राजकीय सूत्रे वाय बी चव्हाण सेंटर येथे बसून हलवत आहेत. अहमद पटेल यांच्याशीही ते सतत संपर्कात आहेत. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जावे हा सल्ला त्यांनीच दिला. शिवसेना नेते अनिल परब हे स्वत: कपिल सिब्बल यांच्याशी बोलले. सिब्बल यांच्याशी पवार यांनीही बोलणे केल्याची सूत्रांनी माहिती दिली.राष्टÑवादीने राज्यपालांकडे मुदतवाढ मागितल्याची कोणतीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांकडूनही वेगवेगळी विधाने समोर आली. परिणामी दोन्ही पक्षातल्या समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस