शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची राणेंची कबुली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 12:56 IST

भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असे चंद्रकांत पाटील हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

मुंबई : राजकीय घडामोडी पाहता बहुमत सिद्ध करण्याइतके पाठबळ मिळवण्यासाठी भाजपला धडपड करावी लागणार आहे. त्यामुळे भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर बाजारात अनेक आमदार आहेत त्यामुळे एक, दोन आमदार परत गेल्याने फरक पडणार नाही असे वक्तव्य भाजपा खासदार नारायण राणे यांनी केल्याने भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केले जाणार असल्याची ही कबुलीचं असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

भाजपने शनिवारी अजित पवारांच्या मदतीने सत्तास्थापन केल्याने राजकीय वर्तुळात भूकंपाचे हादरे बसले आहे. त्यांनतर अनके आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याचे चर्चा पाहायला मिळत होती. मात्र हे आमदार पुन्हा शरद पवारांच्या बाजूने उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अजित पवारांनी त्यांना फसवून शपथविधीला नेले असल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आले होते.

तर याच मुद्यावर बोलताना नारायण राणे यांनी, फसवून शपथविधीला जायला ते आमदार लहान आहेत का? बाजारात अनेक आमदार आहेत त्यामुळे एक, दोन आमदार परत गेल्याने फरक पडणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. जे नेते आमच्यासोबत आले आहेत ते फक्त विकासाची दूरदृष्टी ठेवून आले. भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असे चंद्रकांत पाटील हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. मात्र बाजारात अनेक आमदार असल्याचे वक्तव्य राणेंनी केल्याने व 'ऑपरेशन लोटस' मोहीम आखण्यात आल्याच्या चर्चेने भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केले जाऊ शकतात असे बोलले जात आहे.