शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंची डोकेदुखी वाढवणार?, आता 'त्या' कारभाराची चौकशी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 20:51 IST

Eknath Khadse : एकनाथ  खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. एकनाथ  खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार तसेच दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  

जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील मोठ्या गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. मात्र, गेल्या मविआ सरकारकडून याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने याच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. यासंबंधी राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी आदेश काढले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, ही कारवाई म्हणजे मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. दूध संघाच्या कारभारात एक रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. जर काही भ्रष्टाचार झाला असेल तर, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आपण स्वतःच करू असे म्हटले आहे. तसेच, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करणे आणि चौकशी समिती नियुक्त करण्यामागे मोठे राजकारण असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगाव