शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 06:26 IST

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

नीलेश जोशी/अनिल गवई   निमखेडी (जि. बुलढाणा) -  भारत जोडो पदयात्रेंतर्गत महाराष्ट्रातील जनतेने गेल्या १४ दिवसांत मला प्रेम आणि विश्वास दिला. महाराष्ट्राची शिकवण समरसतेची आहे. ज्यांनी द्वेष पसरविला, ते पण आपलेच आहेत. त्यांच्याविना आपला महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे भावोद्गार समारोपप्रसंगी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी येथे काढले. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

प्रेम व विश्वासाचा संदेश घेत पाच राज्यातून सुमारे १,७०० किमीचा यात्रेचा निम्मा प्रवास महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या सीमेवर ‘एकात्मतेचा प्रकाश’ उजळला. तिरंगी फुगे आकाशात झेपावताच पदयात्रेचा  राज्यातील तील भावपूर्ण प्रवास पूर्ण झाला. सामाजिक सौदार्हाची बीजं महाराष्ट्राच्या हृदयात कायमची पेरली गेली.   

‘जय महाराष्ट्र’ म्हणत घेतला महाराष्ट्राचा निरोप  - निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत राहुल गांधी यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आभार मानले. - देशाच्या विकासासाठी मी सतत संघर्ष करीत राहील, असे आश्वस्त करीत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत  महाराष्ट्रातील जनतेचा निरोप घेतला.

तिरंगी प्रकाश पडताच वातावरण भावपूर्णउपस्थितांनी मेणबत्या प्रज्वलित करताच, अंधुक प्रकाशात राहुल गांधीनी कळ दाबली आणि सत्यमेव जयते स्तंभावर तिरंगी प्रकाश पडला. या प्रकाशात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माची प्रतीके प्रकाशाने उजळली. त्यावेळी भावपूर्ण वातावरण झाले.

या नेत्यांची उपस्थितीलाइट ऑफ युनिटी कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, बाळासाहेब थाेरात, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे,  जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस