शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra flood : अलमट्टीतून आता 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 17:16 IST

Maharashtra Floods : 'राज्यात पूरपरिस्थिती असताना जनतेला दिलासा देणे सोडून चुकीच्या पद्धतीने माहिती देणे उचित ठरणार नाही'

मुंबई :  अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने आज दुपारपर्यंत 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. विरोधकांकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जाते आहे. राज्यात पूरपरिस्थिती असताना जनतेला दिलासा देणे सोडून चुकीच्या पद्धतीने माहिती देणे उचित ठरणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संपूर्ण माहिती समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष करून अशापद्धतीने चुकीची माहिती विरोधकांकडूनदिली जात आहे. कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने आज सकाळीच एक ट्विट करून 4,30,352 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सांगिल्यानंतर सुद्धा कमी प्रमाणात विसर्ग असल्याचे भासविण्यात येत आहे. 3,80,316 क्युसेक इतकी आवक असताना त्यापेक्षा 50,000 क्यूसेकने अधिक विसर्ग करण्यात येत होता. आता हा विसर्ग दुपारपर्यंत 4,50,000 क्युसेकवर पोहोचला आहे, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

दुसरा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या 7 ऑगस्टच्या जीआरसंदर्भातील आहे. त्यात एखादे क्षेत्र 2 दिवस पाण्यात असल्यास मदतीबाबतचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात मदतीचा निकष हा पूर्णत: आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालाच्या आधारावर ठरतो. पण, विरोधकांनी त्यावर लगेच तुघलकी वगैरे आरोप करणे सुरू केले आहे. टीका करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच काळात 30 जानेवारी 2014 चा जीआर पाहिला असता, तर कशी टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यांच्या काळात तर 7 दिवस एखादे क्षेत्र बुडित राहिल्याशिवाय मदत करायची नाही, असा नियम ठरविण्यात आला होता. (सोबत जीआर जोडत आहे.) हे राज्य सरकार संवेदनशील असून, पूर्णत: पूरग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे. आता पूरग्रस्तांना मदत वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असून विरोधक त्याचे राजकारण करीत आहेत अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरAshish Shelarआशीष शेलार