शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 20:51 IST

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.

Maharashtra Election Results 2024: असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ने महाराष्ट्रात आपले खाते उघडले आहे. मालेगाव मध्य मतदारसंघातून पक्षाने निवडणूक जिंकली असून, AIMIM च्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय सेक्युलर लार्जेस्ट असेंबली महाराष्ट्राचे आसिफ शेख रशीद यांचा अवघ्या 75 मतांनी पराभव केला आहे.

मालेगाव मध्य मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे निहाल अहमद तिसऱ्या तर काँग्रेसचे इजाज बेग अजीज बेग चौथ्या स्थानावर आहेत. येथे नऊ उमेदवारांना NOTA पेक्षा कमी मते मिळाली. या जागेवर NOTA च्या बाजूने 1089 मते पडली. 2019 च्या निवडणुकीतही एआयएमआयएमला मालेगाव मध्य मतदारसंघात यश मिळाले होते. 2019 मध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीके यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी एआयएमआयएमने उमेदवार बदलला आणि त्याचा फायदाही झाला.

ओवेसींच्या पक्षातील हे दोन मोठे नेते पराभूत झाले

ओवेसी यांच्या पक्षाने महाराष्ट्रात 14 उमेदवार उभे केले होते. यामध्ये माजी आमदार वारिस पठाण आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या अतुल सावे यांनी अवघ्या 1177 मतांनी जलील यांचा पराभव केला. तर, भिवंडी मतदारसंघातून वारिस पठाण पाचव्या स्थानावर आहेत. त्यांना केवळ 15800 मते मिळाली. येथील विजयी उमेदवार भाजपचे महेश प्रभाकर चौगुले यांना 70172 मते मिळाली आहेत.

महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वात मोठा विजय मिळाला आहे. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाने 235+ जागा मिळवत महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आहे. विजयाचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीचा तर अक्षरशः सुपडा साफ झाला आहे. मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा