शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या स्थैर्याबद्दल देवेंद्र फडणवीस निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 08:05 IST

चिंता करू नका, आपण सरकार स्थापन करताना पूर्ण विचारांती केलेले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणारच. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावदखील आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपाच्या आमदारांना दिला.

मुंबई  - चिंता करू नका, आपण सरकार स्थापन करताना पूर्ण विचारांती केलेले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणारच. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावदखील आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपाच्या आमदारांना दिला.वसंत स्मृती या दादरमधील भाजपच्या कार्यालयात ही बैठक झाली. त्यास प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि कोअर कमिटीचे सदस्य मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय मजबूत सरकारच्या दृष्टीने घेतलेला आहे. आपल्या सरकारला कुठलाही धोका नाही. सरकारच्या स्थैर्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या शंकांवर विश्वास ठेवूनका.बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदार लागतात. त्यापेक्षा पुष्कळ जास्त आमदार आजच आपल्याकडे आहेत याबाबत खात्री बाळगा, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेवरही टीका केली. आपला इतक्या वर्षांचा मित्र पक्ष आपल्यासोबत राहील, असे मनोमन वाटत होते पण त्यांच्या मनात वेगळेच होते. नंतर त्यांची आपल्यासोबत येण्याची मानसिकता नव्हती. या ना त्या कारणाने ते सत्तास्थापनेची चर्चा टाळत राहिले. त्यांना आपल्या सोबत यायचे नव्हते. इतर पक्षांनी त्यांची फसवणूक केली आणि ते देखील या फसवणुकीला बळी पडले.फडणवीस-पवार यांच्या अभिनंदनाचा ठरावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आमदारांच्या बैठकीत पारित करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019