शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: '...तर मातोश्रीसमोर सभा घेऊन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देईन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 22:36 IST

Maharashtra Election 2019 नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर

सावंतवाडी: वेळ पडल्यास माझ्यावर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना 24 तारखेनंतर मातोश्रीच्या समोर सभा घेऊन उत्तर देईन, असं भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी म्हटलं आहे. मी शिवसेनेत असेपर्यंत उद्धव ठाकरेंनी कधीही डोकं वर काढलं नव्हतं. माझ्यात गुणवत्ता होती, म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी मला पदं दिली, असंदेखील राणे म्हणाले. ते भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारसभेत बोलत होते.उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवणाऱ्या नारायण राणेंनी गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार असलेल्या दीपक केसरकर यांचाही समाचार घेतला. 'सिंधुदुर्ग जिल्ह्याला राजकारण नकोय. तर विकास हवाय. दहा वर्षांत दीपक केसरकर यांनी काही केलं नाही. कर्तृत्वच नसल्यानं केसरकरांनी मतं मागण्याचा अधिकार गमावला आहे. सावंतवाडीतील जनता त्यांच्या कामाबद्दल समाधानी नाही. विधानसभेत केसरकर यांना जोकर म्हणतात. त्यांना प्रश्नांची उत्तरंदेखील देता येत नाही,' अशी टीका राणेंनी केली. सिंधुदुर्गातलं पर्यटन वाढल्यानं माझा पराभव करण्यासाठी गोव्याचं मंत्रिमंडळ सावंतवाडीत आल्याचं केसरकर म्हणाले होते. त्यावर गोव्यात भाजपाचं सरकार असल्यानं भाजपाचे मंत्री येणार नाही, तर मग मंत्री कोणाचे येणार, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. केसरकर यांनी पर्यटनासाठी काय केलं. गोव्यात लाखो पर्यटक येतात. तसे सिंधुदुर्गात का येत नाहीत? गोव्यातील पर्यटक यायला सिंधुदुर्गात चांगले रस्ते आहेत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. केसरकर खोटं बोलून मंत्री झाले. ते बेडकापेक्षा जास्त उड्या मारतात. भाजपात येतो असं सांगून त्यांनी मुख्यमंत्र्याकडून मंत्रीपद मिळवलं. मात्र यापुढे ते आमदारही होणार नाहीत. कारण आमदार म्हणून ते पूर्णपणे निष्क्रिय होते. त्यांना धड बोलताही येत नाही. मी केलेली कामं सांगू शकतो. तशी कामं केसरकर सांगू शकतात का, असा प्रश्न राणे यांनी विचारला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sawantwadi-acसावंतवाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाDeepak Kesarkarदीपक केसरकर