शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मला पाकिस्तानधार्जिणा म्हणता, मग पद्मविभूषण का दिलात?; शरद पवारांचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:51 IST

मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याचा आरोप

मुंबई: विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणाचार भावला. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानचं कौतुक वाटतं, अशा शब्दांमध्ये मोदींनी पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यांच्या या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.मी पाकिस्तानधार्जिणा वाटतो, तर मग भाजपा सरकारनं मला पद्मविभूषण पुरस्कार का दिला, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याचा घणाघाती टीका पवार यांनी 'सीएनएन-न्यूज१८'ला दिलेल्या मुलाखतीत केली. 'पंतप्रधानपद ही एक वैधानिक पद आहे. त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय असतात. त्यांनी योग्य माहिती घेऊन वक्तव्य केलं असतं, तर ते मला आवडलं असतं. पण पंतप्रधानच कोणतीही माहिती न घेता बेछूट विधानं करत असतील, तर त्यावर काय बोलावं?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मला पाकिस्तानात जास्त रस आहे. त्या देशात माझे हितसंबंध आहेत. मी देशविरोधी आहे असं मोदींना वाटत असेल, तर मग त्यांच्या सरकारनं मला पद्मविभूषण पुरस्कार का दिला, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. पद्मविभूषण पुरस्कार खूप मोठा आहे. तो देशातला दुसऱ्या क्रमाकांचा नागरी पुरस्कार आहे. भाजपा सरकार जर इतका मोठा पुरस्कार मला देत असेल, तर मी देशाची काहीतरी महत्त्वपूर्ण सेवा केली असा त्याचा अर्थ होतो. एका बाजूला पुरस्कार द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला असे आरोप करायचे, हा दुटप्पीपणा कशासाठी?, असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. देशातील सर्वाच्च पदावर बसलेली व्यक्ती इतकी दुटप्पी आहे, अशी खरमरीत टीकादेखील पवारांनी केली.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारPakistanपाकिस्तान