शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: तीन तिगाडा, काम बिगाडा... एकनाथ खडसेंचा पत्ता कट होण्याची तीन कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 10:41 IST

एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज चौथी यादी जाहीर केली. या यादीत ७ उमेदवारांचा समावेश आहे. माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पत्ता कापण्यात आल्यानं भाजपाची चौथी यादी चर्चेत आहे. एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या बंडखोरीची शक्यता जवळपास मावळली आहे. मात्र खडसेंचा पत्ता का कापला, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कथित भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे अडचणीत आले. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्रिपद गेल्यानंतर खडसे सतत सरकारवर निशाणा साधत होते. स्वत:च्याच पक्षाच्या सरकारवर केलेली हीच टीका त्यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खडसेंना उमेदवारी दिली असती, तर  पुन्हा त्यांच्या मंत्रिपदाचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यांच्या मुलीच्या बाबतीत तो प्रश्न येणार नाही. रोहिणी खडसेंना फार तर राज्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. 

कधीकाळी खडसे उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा चेहरा होता. मात्र आता ती जागा गिरीश महाजन यांनी घेतली आहे. खडसे यांची पूर्वी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर पकड होती. या परिस्थितीत आता बदल झाला आहे. महाजन यांनी अनेक निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळवून दिलं. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू, संकटमोचक अशी प्रतिमा असलेले महाजन खडसेंच्या खूप पुढे निघून गेले आहेत. 
राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले खडसेंनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देण्याची भाषा जाहीररित्या केली. खडसेंनी केलेली ही भाषा पक्ष नेतृत्त्वाला खटकली. त्यांना याबद्दल वेळोवेळी समजही देण्यात आली. मात्र तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही बदल झाला नाही. खडसेंना उमेदवारी न दिल्यास लेवा पाटील समाज नाराज होऊ शकतो, याची भाजपाच्या वरिष्ठांना कल्पना होती. लेवा पाटील समाजाच्या नाराजीचा फटका भुसावळ, रावेर आणि जळगाव या तीन मतदारसंघात बसू शकत होता. त्यामुळेच त्यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आली. यामुळे खडसेंच्या बंडाची शक्यतादेखील टळली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Khadaseएकनाथ खडसेmuktainagar-acमुक्ताईनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजन