शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 23:02 IST

तणाव वाढल्यानं भाजपा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

नाशिक: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फटाके फोडल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर भाजपा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी फटाके वाजवून पळ काढला. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. सध्या भाजपा कार्यालयाबाहेर भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात आहेत.शिवसेना, भाजपामधील संघर्ष अतिशय विकोपाला गेला आहे. सत्तापदांचं समान वाटप करा, असा आग्रह करत शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीवेळी देण्यात आलेला शब्द पाळा, असं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं. मात्र मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यामुळे शिवसेना, भाजपामधील संघर्ष वाढला.गेल्या शुक्रवारी (८ नोव्हेंबरला) देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. आमचे फोन उचलायला उद्धव यांच्याकडे वेळ नाही. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीशी दिवसातनू तीन-तीन वेळा चर्चा करायला वेळ आहे, अशा शब्दांत फडणवीस उद्धव यांच्यावर बरसले. यानंतर थोड्याच वेळात उद्धव यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्रिपदाबद्दल मी खोटं बोलत नाही. बाळासाहेबांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच, असं उद्धव म्हणाले होते. यानंतर आज शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यानं शिवसेनेला अपयश आलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा