शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: फडणवीसांच्या राजीनाम्यावर 'मिसेस मुख्यमंत्री' म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 10:19 IST

अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या भावना

मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या काही तास आधी फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या राजीनाम्याचं पत्नी अमृता यांनी कौतुक केलं आहे. मला तुमच्या निर्णयाचा आणि भूमिकेचा अभिमान वाटतो, असं ट्विट अमृता यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा, महाराष्ट्र भाजपाला टॅगदेखील केलं आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. निवडणूक निकाल जाहीर होऊन 2 आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे.  राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला. मात्र शिवसेना, भाजपाला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आला नाही. शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यासाठी शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. मात्र त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही शब्द शिवसेनेला देण्यात आला नव्हता, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी ते घेतले नाहीत असं सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. माझे फोन घ्यायला वेळ नाही. मात्र विरोधकांशी चर्चा करायला त्यांना वेळ आहे, असा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची माणसं जी वक्तव्यं करताहेत, त्यामुळे सरकार स्थापन होत नाही. आम्ही प्रत्युत्तर देऊ शकत नाही, असं समजू नका. तुमच्या भाषेपेक्षा जास्त प्रभावी भाषा आम्ही वापरू शकतो. पण आम्ही तसं करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीस