शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : दिवाळीपूर्वीच्या निकालाने अनेकांच्या पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 01:13 IST

राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी देण्याचे आधीच जाहीर केले आहे पण त्यामुळे दिवाळीसारख्या आनंदाच्या उत्सवकाळात पराभूत उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे हजारो समर्थक नक्कीच खूश नसतील. दिवाळीआधी मतदान आणि दिवाळीनंतर निकाल असे केले असते तर ते टाळता आले असते आणि निकालाच्या निमित्ताने येणारी राजकीय कटूता ऐनदिवाळीत आली नसती.अर्थात, आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, आयोगाने आधीच या बाबतचा विचार करायला हवा होता, असे विविध पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये १५ आॅक्टोबरला मतदान झाले आणि १९ आॅक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आला होता. मतदान आणि निकाल यात तीन दिवसांचे अंतर होते. यावेळी ते दोनच दिवसांचे आहे. मतदानानंतर किती दिवसांनी मतमोजणी झाली पाहिजे या बाबतचा काही नियम नाही. परिस्थितीनुसार त्या बाबतचा निर्णय आयोगाला घेता येतो.येत्या दहा-बारा दिवसात प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मुंबईपासून गल्लीपर्यंत एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल आणि २१ तारखेच्या मतदानापर्यंत ही कटूता शिगेला पोहोचलेली असेल. शेवटी निवडून येणार ते २८८ जणच. राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. याचा अर्थ पराभूत होणाऱ्या उमेदवारांची संख्या २९५१ असेल. एवढे उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, नातेवाइक आणि हजारो समर्थकांची दिवाळी केवळ निकालामुळे गोड होणार नाही.पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा हिरमोडदसरा आणि दिवाळीच्या दरम्यान होणारी निवडणूक आणि निकाल यामुळे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची यंदा खºया अर्थाने दिवाळी आहे असे म्हटले जात आहे. तथापि, असे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते आजही आहेत की जे पदरमोड करून आपापल्या पक्षाचा प्रचार करतात. असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांच्यासाठी झटले ते पराभूत झाल्यानंतर त्यांनाही दिवाळीचा फारसा आनंद नसेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019