शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचा पाठिंबा वेटिंगवरच; काँग्रेस-राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 20:30 IST

मॅरेथॉन बैठकानंतरही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय नाही

मुंबई: दिवसभर मॅरेथॉन बैठका घेऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीनं शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे एनडीएनतून बाहेर पडलेली शिवसेना अद्याप वेटिंगवरच आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आज निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे भरपूर वेळ असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला ‘वेटिंग’वर ठेवलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार आणि अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यात राष्ट्रपती राजवट झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत काँग्रेस, राष्ट्रवादीनं शिवसेनेबद्दलची आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली. आता राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे बराच अवधी आहे. त्यामुळे आम्ही सवडीनं निर्णय घेऊ, असं म्हणत शरद पवारांनी शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दल सावध पवित्रा घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवलीय. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दलचा निर्णयदेखील एकत्रच घेऊ, असं पवार म्हणाले.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचारसरणीत फरक आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमांसह अनेक मुद्यांवर चर्चा गरजेची असल्याचंदेखील पवार यांनी म्हटलं. यावेळी काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी राज्यपालांच्या कारभारावर सडकून टीका केली. ‘राज्यपालांकडून मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करून मनमानी सुरू आहे. राज्यपालांनी बहुमताचा दावा करण्यासाठी भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीला निमंत्रित केलं. मात्र काँग्रेसला आमंत्रण देण्यात आलं नाही. राज्यपालांची ही कृती चुकीची आहे,’ असं पटेल म्हणाले. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला आहे. याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा