शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

Maharashtra Election 2019 : दु:खणं अंगावर काढल्यानं धीरज देशमुख आजारी, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 17:50 IST

Maharashtra Election 2019 : धीरज देशमुख यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे

विधानसभेची लढाई अंतिम टप्प्यात आली असून आता प्रचारातील रंगत वाढली आहे. उमेदवारांनी मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. लातूरमध्ये एकाच कुटुंबातील दोघं सख्खे भाऊ अर्थात अमित देशमुख आणि धीरज देशमुख विधानसभेच्या रिंगणात असून या दोघांना आमदार करण्यासाठी संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मात्र, विधानसभेच्या रणधुमाळीत फिरताना धीरज देशमुख आजारी पडले आहेत. 

धीरज देशमुख यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये मी आजारी असल्याचे धीरज यांनी सांगितले. धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. धीरज यांच्या प्रचारासाठी अख्ख देशमुख कुटुंब प्रचाराला लागलं आहे. सेलिब्रिटी असलेल्या जेनलिया आणि रितेश या जोडीनेही पायाला भिंगरी लावून प्रचारात उडी घेतली आहे. 

धीरज देशमुख यांची फेसबुक पोस्ट 

कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता, पण प्रचार सभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखान्यात अॅडमीट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे. सध्या मी उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी असे कांहीं नाही.माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, हितचिंतक व आपण सर्वजण माझ्यासाठी प्रचार करत आहात. या दरम्यान आपणही तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होवून आपणासोबत प्रचारात सहभागी होईन हा विश्वास मला आहे. माझ्या अनुपस्थितीत आपण प्रचाराचे कार्य जोमात सुरू ठेवल्याबद्दल मी आपले शतश: आभार व्यक्त करू इच्छितो."तुम्ही आहात, म्हणून मी आहे"लवकरच भेटू !- आपला धिरज 

टॅग्स :Dhiraj Deshmukhधीरज देशमुखcongressकाँग्रेसlatur-rural-acलातूर ग्रामीणlaturलातूरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019