शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मोठा राहिलेलो नाही- खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 16:13 IST

शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला न ठरल्यानं सरकार स्थापनेचा तिढा कायम

शिर्डी: पाच वर्षांपूर्वी शिवसेना, भाजपाची युती तुटल्याची घोषणा करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून काहीसे लांब आहेत. भाजपाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर गेलेले खडसे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. त्यावेळी त्यांना शिवसेना, भाजपामध्ये सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिवसेना, भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतका मी मोठा राहिलेलो नाही असं म्हणत खडसे यांनी त्यांच्या मनातली खंत अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून खडसे राजकारणापासून चार हात लांब राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपानं एकनाथ खडसेंना तिकीट नाकारलं. यानंतर खडसे समर्थकांची नाराजी समोर आल्यावर पक्षानं त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. मतदारसंघात रोहिणी खडसे विरुद्ध इतर सर्व असा सामना झाल्यामुळेच हा पराभव झाल्याचं खडसेंनी निकालानंतर म्हटलं होतं.निवडणुकीचा निकाल काहीही लागो, मी कायम शिर्डीत बाबांच्या दर्शनाला येतो, असं खडसेंनी सांगितलं. 'दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काय ठरलं याची मला कल्पना नाही. त्यामुळे याबद्दल मी फारसं भाष्य करू शकत नाही. मात्र शिवसेनेची मागणी स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवं', असं म्हणत त्यांनी राज्यात महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपावर बॅकफूटवर आली आहे का या प्रश्नाला त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. भाजपा बॅकफूटवर आलेली नाही. तणाव वाढवायचा नसल्यानं त्यांच्याकडून शांतपणे चर्चा सुरू आहे. युती तुटू नये आणि महायुतीचं सरकार स्थापन व्हावं या भावनेनं भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाला राज्यात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचं ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचं सरकार येईल का, अशा जर-तरच्या प्रश्नांना अर्थ नसल्याचंदेखील ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाShiv Senaशिवसेना