शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व

By admin | Updated: January 15, 2017 17:50 IST

मुंबई अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. महिला गटात नाशिकच्या अनुभवी मोनिका आथरेने

महेश चेमटे/ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 15 -  मुंबई अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. महिला गटात नाशिकच्या अनुभवी मोनिका आथरेने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर कोल्हापूरच्या मिनाक्षी पाटीलने रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या अनुराधा सिंगला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तामिळानाडूच्या जी.लक्ष्मणनने आपल्या पहिल्याच मॅरेथॉनमध्ये सुवर्ण कमाई करताना बाजी पुरुष गटात मारली मारली. तर सचिन पाटील आणि गतविजेता दिपक कुंभार या कोल्हापूरच्या धावपटूंनी रौप्य व कांस्य मिळवले.भिलाई येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रॉसकन्ट्री स्पर्धेमुळे यंदा अर्धमॅरेथॉनला कमी प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. महिलांमध्ये १० किमी अंतरानंतर मिनाक्षीने आघाडी घेतली. मात्र शेवटच्या टप्प्यात अनुभवी मोनिकाने निर्णायक आघाडी घेत १ तास १९ मिनिटे १३ सेंकद अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले. तर मिनाक्षीने १ तास २० मिनिटे ५३ सेंकदात रौप्यपदक मिळवले. उत्तरप्रदेशच्या (लखनऊ) अनुराधाने १ तास २५ मिनिटे २० सेंकद वेळेसह कांस्य जिंकले.पुरुषांमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या घ्लक्ष्मणनने १ तास ५ मिनिटे ५ सेंकदाची वेळ नोंदवत सुवर्ण निश्चित केले. तर, यानंतर द्वितीय क्रमांकासाठी सचिन आणि दिपक यांच्यात कडवी स्पर्धा रंगली. १० किमी अंतर दोघांनीही एकाच वेळेत पूर्ण केली. मात्र अंतिम रेषा नजरेत येताच सचिनने वेग वाढवताना सचिनने १ तास ६ मिनिटे २२ सेंकद वेळेसह रौप्य पदक पटकावले. तर गतविजेता दिपक कुंभारला १ तास ६ मिनिटे २८ सेंकद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पायलटची मदत...गतविजेत्या दीपक कुंभारचे तिसरे स्थान यंदाचा अनपेक्षित निकाल ठरला. मात्र, सचिनला धावताना पायलटची मदत झाली. नाहीतर माझे दुसरे स्थान नक्कीच हुकले नसते अशा शब्दांत दीपकने आपली निराशा व्यक्त केली.याबाबत दीपक म्हणाला, ह्यशर्यतीत ५ किमी आणि १० किमी मी आणि सचिन बरोबरीत होतो. १२ किमीनंतर मी आघाडी घेतली. आघाडीरील धावपटूचा पायलट सचिनच्या परिचयाचा असल्याने तो त्याच्या बरोबर राहिला. याचा फायदा घेत सचिनने अखेरची ४ किमी बाकी असताना मला गाठून अखेरची ५०० मीटर बाकी असताना आघाडी घेत रौप्यपदक मिळवले. तो पायलट नसता तर रौप्यपदकाचा निकाल वेगळा लागला असता.  त्या  पायलट विषयी अर्धमॅरेथॉनचे प्रमुख होमियार मेस्त्री म्हणाले की, ह्यसर्व नियमांनुसार झाले. आघाडीच्या धावपटूंच्या आसपास अधिकृत पायलट असतो. तो पायलट अधिकृत होता आणि त्याला सुचना देण्यात आल्या होत्या. मुळात धावण्याचा मार्ग मोठा होता. त्यामुळे यात काहीच आश्चर्य नाही. तर, सचिन याबाबत म्हणाला, ह्यगेली ९ वर्षे मी मुंबईत सराव करतो. त्यामुळे मुंबईतील बहुतांशी धावपटू, प्रशिक्षकांशी ओळख आहे. मला कोणाचीही मदत झाली नसून मोक्याच्यावेळी कामगिरी उंचावून बाजी मारली.ह्ण मॅरेथॉनमध्ये यंदाचे सहावे पदक आहे. दिल्ली मॅरेथॉन विजयी वेळेत पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला. त्यानंतर भोपाळ, हैद्रराबाद, वसई-विरार, कोलकातामध्ये कामगिरी उंचावली. यंदाची अर्धमॅरेथॉन ही माझी शेवटची अर्धमॅरेथॉन असून यापुढे मी ४२ किमीसाठी धावेल. २६ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली मॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदवत वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पात्रता मिळवण्याचे लक्ष्य आहे.- मोनिका आथरे, विजेती - अर्धमॅरेथॉन २०१२ पासून आजपर्यंत एकाही अर्धमॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक सोडला नाही. त्यामुळे येथेही आत्मविश्वासाने सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात येथे विजयी झाल्याचा आनंद आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर लष्करात दाखल झाल्याने कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली.- जी.लक्ष्मणन, विजेता - अर्धमॅरेथॉन