शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

Maharashtra Day 2020 : सांस्कृतिक वैभव! महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 21:21 IST

Maharashtra Day 2020 : महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक विविधता पाहायला मिळते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब येथील भाषांवरही दिसते. त्यामुळेच महाराष्ट्रात अगदी कोसाकोसावर भाषेचा लहेजा बदलत जातो.

मुंबई - वैशिष्टपूर्ण भौगोलिक व सामाजिक रचनेमुळे देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे स्थान सदोदित अनन्यसाधारण राहिले आहे. भौगोलिक आकारमानानुसार महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. साहजिकच इतका मोठा भूप्रदेश असणाऱ्या महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक विविधता पाहायला मिळते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब येथील भाषांवरही दिसते. त्यामुळेच महाराष्ट्रात अगदी कोसाकोसावर भाषेचा लहेजा बदलत जातो. यामधूनच राज्यात अनेक स्थानिक बोलीभाषा अस्तित्वात आल्या आहेत. मराठी, हिंदी, उर्दू , कानडी व हिंदी अशा विविध भाषांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या या बोलीभाषा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मानले जाते.

मराठवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्य़ात ही बोलीभाषा वापरली जाते. या बोलीभाषेवर कानडी व उर्दू भाषेचा प्रभाव आहे. 

मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. विशिष्ट हेल काढून आलेले अनुनासीक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. 

झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. 

नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. यावर काही प्रमाणात हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो.

अहिराणी - जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. 

तावडी - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. 

आगरी - आगरी बोली ही महाराष्ट्राच्या  उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारा मोठा समाज आहे.

चंदगडी - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. 

वऱ्हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी भाषेत लिहिला गेला. या बोलीभाषेवर फारसी व हिंदीचा प्रभाव आहे.

देहवाली - देहवाली भाषा प्रामुख्याने भिल्ल समाजात प्रचलित आहे. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. 

कोल्हापुरी - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात कोल्हापुरचे विशेष स्थान आहे. ग्रामीण लहेजा असणाऱ्या या भाषेचा रांगडेपणा विशेष लक्ष वेधून घेतो. 

बेळगावी - महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमेवर असणाऱ्या बेळगावात ही भाषा बोलली जाते. कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून ही बोलीभाषा निर्माण झाली आहे. 

वाडवळी - ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते.  

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र