शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र डेंजर झोनकडे! धूलिकणांचे प्रदूषण वाढले, धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 06:25 IST

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील उत्सर्जनामुळे महाराष्ट्रात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले असून, त्याची वाटचाल अतिधोकादायक पातळीकडे होत असल्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे. 

मुंबई :

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील उत्सर्जनामुळे महाराष्ट्रात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले असून, त्याची वाटचाल अतिधोकादायक पातळीकडे होत असल्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे. 

काय म्हणतो अहवाल?औष्णिक वीज निर्मिती केंद्रे, घन कचरा जाळणे व वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे राज्यातील एअरोसोल प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. महाराष्ट्रातील वायू प्रदूषणावर आतापर्यंत सर्वाधिक परिणाम हा कोळसाधारित वीज निर्मिती प्रकल्पांमुळे झाला आहे. प्रकल्पांची क्षमता वाढविणे सुरूच राहिले तर राज्याचा समावेश सर्वाधिक धोकादायक पातळीवर होईल.

धोका काय? - प्रदूषित धूलीकणांमध्ये सागरी मीठ, धूळ, सल्फेट, ब्लॅक आणि ऑरगॅनिक कार्बन यांच्या अतिसूक्ष्म कणांचा समावेश असतो.- श्वसनाद्वारे ते शरीरात गेल्यास मानवी आरोग्यास घातक असतात.

कोलकाताच्या बोस इन्स्टिट्यूटच्या जाणकारांनी ‘अ डीप इनसाइट इन टू स्टेट लेव्हल एअरोसोल पोल्युशन इन इंडिया’ या शीर्षकाचा अभ्यास अहवाल प्रकाशित केला. 

महाराष्ट्रात कोळसाधारित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता किमान १० गिगा वॉटने कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. - मोनामी दत्ता, वरिष्ठ अभ्यासक, बोस इन्स्टिट्यूट.महाराष्ट्र धोकादायक झोनमध्ये आहे. वाढत्या प्रदूषणामुळे राज्य अति धोकादायक वर्गवारीत जाण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये मृत्यूदर वाढण्याची, तसेच आयुर्मान कमी होण्याबरोबरच आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.- डॉ. अभिजित चटर्जी, बोस इन्स्टिट्यूट.

टॅग्स :pollutionप्रदूषण