शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा हाहा:कार! आज २६ हजाराहून अधिक रुग्ण; लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 9:23 PM

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १४४ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. तसंच ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येची ही वाढ धडकी भरवणारी ठरत आहे. त्यामुळे राज्य आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

राज्यात आज दिवसभरात ५३३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा आता ८७ हजार ५०५ वर पोहोचला आहे. राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा एकूण आकडा ७९७ इतका झाला आहे. तर ३३० जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. 

राज्यात आज १४४ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत आणि यात तब्बल १०० रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. नागपुरात ११ तर ठाणे आणि पुणे मनपामध्ये प्रत्येकी ७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. 

मुंबईची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचालमुंबईत आज तब्बल १५ हजार १६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या आकडेवारीपेक्षा तब्बल ३९ टक्के रुग्णवाढ आज मुंबईत नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईची दैनंदिन रुग्णसंख्या २० हजाराच्या घरात गेल्यानंतर शहरात लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, असं विधान मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल चहल यांनी केलं होतं. त्यामुळे रुग्णवाढ पाहता मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं होतंय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन