शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Maharashtra Corona Update : राज्यात 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद, एकाचा मृत्यू; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजारच्या जवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 23:43 IST

राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात मंगळवारी 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 81,51,176 वर पोहोचला आहे. ही आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. याच बरोबर, आता राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,48,461 वर पोहोचली आहे.

राज्यात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट दिसून आली होती. सोमवारी राज्यभरात 328 नवे कोरोना बाधित आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसेच, रविवारी राज्यात 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

राजधानी मुंबईत समोर आले सर्वाधिक रुग्ण -ताज्या आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईत 242 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर नागपुरात 105, पुण्यात 58 आणि नवी मुंबईत 57 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे, राज्यातील एकमेव मृत्यूची नोंद अकोला शहरात झाली आहे.

महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांचा आकडा 4,875 -राज्यात मंगळवारी 710 रुग्ण बरे झाले असून, यासह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 79,97,840 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 4 हजार 875 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. मृत्यू दरासंदर्भात बोलायचे झाल्यास, तो राज्यात 1.82 टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 98.12 टक्के आहे. हेल्थ बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 12,841 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस