शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारींनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 06:07 IST

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते.

मुंबई : ‘आपल्या पत्रातील असंतुलित आणि धमकीवजा सूर बघून मी खूपच दु:खी झालो. अशा पत्रामुळे राज्यपालांच्या उच्चतम संवैधानिक कार्यालयाची प्रतिमा खालावली गेली, तिचे अध:पतन झाले,’ या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे संमती मागितली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे तीन ज्येष्ठ मंत्री राज्यपालांना गेल्या रविवारी जाऊन भेटले आणि त्यांनीही साकडे घातले. त्यावर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मी निर्णय देईन, असे राज्यपाल म्हणाल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले होते.

राज्य सरकारने सोमवारी सकाळी राज्यपालांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले. सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत पत्र पाठविले. ‘राज्यपालांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये. विधानमंडळाने केलेले कायदे तपासण्याचा अधिकार आपल्याला नाही,’ असे ठाकरे यांनी पत्रात सुनावले होते. याच पत्राचा संदर्भ देत राज्यपालांनी मंगळवारी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात ही नाराजी बोलून दाखविली.

राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते. अध्यक्ष निवडीबाबतची प्रक्रिया ठरवायला तुम्ही ११ महिने घेतले आणि नियम आमूलाग्र बदलले. याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कायदेशीर अभ्यास करणे गरजेचे आहे. संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.

राज्य सरकारदेखील राज्यपालांवर नाराज- राज्य सरकार पण राज्यपालांवर नाराज आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबद्दलचा संघर्ष कालही टोकाला जावू शकला असता, पण राज्य सरकारने संयम बाळगला. - राज्यपाल जेव्हा राजी होतील आणि अनुमती देतील तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे