शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:12 IST

Maharashtra CM : एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला, तर शिवसेनेतील इतर नेत्यांना संधी मिळू शकते.

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास आठ दिवस झाले आहेत, पण अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झाले आहे. पण, भापकडून कोणाला संधी मिळणार, हा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. पण, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. आता अशा परिस्थितीत शिंदे पक्षातील कोणत्या नेत्याला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

शिवसेनेच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री कोण होणार, याची अंतिम घोषणा एकनाथ शिंदेच करतील, असे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे म्हणणे आहे. शिंदे शुक्रवारी सायंकाळपर्यंत याबाबत घोषणा करू शकतात. मात्र, सध्या ते सातारा या त्यांच्या गावी गेले आहेत. आता ते नेमका काय निर्णय घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मुख्यमंत्री आणि एका उपमुख्यमंत्र्याचे नाव निश्चित भाजपच्या कोट्यातून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. याबाबतचा निर्णयही महायुतीत घेण्यात आला आहे. त्याची अधिकृत घोषणा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर केली जाईल. तर, राष्ट्रवादीच्या कोट्यातून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, हे निश्चित आहे. अजित पवार याआधीही उपमुख्यमंत्री राहिले आहेत. अजित पवारांच्या नावावर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम आहे. 

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

एखाद्या माजी मुख्यमंत्र्याने मंत्री किंवा उपमुख्यमंत्री होणे, ही महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन गोष्ट नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मविआ सरकारमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदे भूषवली आहेत. तर, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री का व्हायचे नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपद नकोय, असे बोलले जात आहे.

शिंदे नाही तर कोण?शिंदे नाही तर कोण, असा प्रश्न आहे. शिवसेनेचे (शिंदे) संजय शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार, उपमुख्यमंत्री कोण होणार, हे एकनाथ शिंदेच ठरवतील. चर्चेत पहिले नाव आहे ते त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे आहे. श्रीकांत सध्या लोकसभेचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे स्वतः मुलाला उपमुख्यमंत्री बनवून आपला वारसा पुढे चालवू शकतात. जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. पाटील यांच्या परिसरात संभाव्य उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टरही लावण्यात आले आहे. तर, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वतीने दीपक केसरकर आणि भरत गोगवाले यांनी मोठी भूमिका बजावली होती. शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री न झाल्यास या दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा