शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस, पोस्ट; नेमके काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 08:26 IST

Maharashtra Bandh Update: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे.

काल दिवसभरात जाळपोळीचे प्रकार घडल्यानंतर आज मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल साईट्सवर पोस्ट मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहेत. हे सर्व मराठा आंदोलक करत असले तरी अशाप्रकारे कोणताही बंद आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांकडून पुकारण्यात आलेला नसल्याचा खुलासा मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र बंद बाबत व्हायरल होत असणाऱ्या मेसेजवर मराठा समाजाने भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र बंदचा कोणताही मेसेज जरांगे पाटलांकडून आलेला नाही. यामुळे सर्व आहे तसे सुरु राहणार असल्याचे ठाण्याताल मराठा समाजाने सांगितले आहे. 

दरम्यान, साताऱ्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. आज पुकारण्यात येणाऱ्या बंद मध्ये सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. हा बंद अगदी शांततेत पार पाडावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे. 

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील खंडाळी पाटीजवळ मराठा आंदोलकांनी जाळपोळ केली आहे.  सोलापूर - पुणे महामार्गांवर टायर जाळून मराठा आंदोलकांनी महामार्ग अडविला होता. सोलापूर - पुणे महामार्ग अडवल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याचे कारण देत धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले आहेत. बीड जिल्ह्यामध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा