शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव होतं, ऐनवेळी का कापलं हे विचारू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:37 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. या यादीत माझं नाव होतं पण काही कारणं असतील. दुसऱ्या विस्तारात मी असेन असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

औरंगाबाद - मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यात ज्यांनी पहिल्यांदा उठावात साथ दिली त्यांना मंत्री बनवले आहेत. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही पहिल्या यादीत माझं नाव होतं पण ऐनवेळी का कापलं मी विचारू त्यांना विचारू शकत नाही. शिंदे सरकारमध्ये मी मंत्रिमंडळात राहणार आहे असा विश्वास शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. 

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. या यादीत माझं नाव होतं पण काही कारणं असतील. दुसऱ्या विस्तारात मी असेन. मी मंत्रिपदावर दिसेन. कुठेही टेन्शन नाही. मी मंत्रिमंडळात राहणार आहे असंही त्यांनी म्हटलं. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. त्यात प्रामुख्याने आमदार संजय शिरसाट यांच्या नावाचा समावेश होता. मात्र मी नाराज नाही असा खुलासा शिरसाट यांनी केला होता. 

मराठवाड्यातून चौघांनाच मंत्रीपदाची लॉटरीराज्य मंत्रिमंडळात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन प्रतिनिधित्व मिळाले असून उर्वरित सहा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार पुढील विस्तारात संधी मिळेल या आशेवर आहेत. या प्रदेशात भाजपाचे सोळा तर शिंदे समर्थक आमदारांची संख्या दहा आहे. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे आणि तानाजी सावंत या चौघांची वर्णी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला तर दुसरीकडे भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांच्यासह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

‘मविआ’त होते सात मंत्रीमहाविकास आघाडी सरकारमध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय बनसोडे असे सात जण मंत्री होते. मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला लाॅटरी लागली आहे. शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून सावे यांची वर्णी लागली असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे