शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Cabinet Expansion: अस्लम शेख यांच्या मंत्रिपदावरून पक्षात असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 03:43 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना मुंबईतील अल्पसंख्याक चेहरा म्हणून संधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना मुंबईतील अल्पसंख्याक चेहरा म्हणून संधी मिळाली आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्याने काँग्रेस पक्षात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय, याकूब मेमनला फाशी देऊ नये यासाठी सही करणाऱ्यांपैकी एक असलेल्या शेख यांना ठाकरे मंत्रिमंडळात कसे स्थान मिळाले, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात याकूब मेमनला फाशीची शिक्षा जाहीर झाली. त्यावेळी अस्लम शेख यांनी २८ जुलै २०१५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना याकूब मेमनला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती करणारे पत्र लिहिले होते. त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे २००४ पासून सलग तिसऱ्यांदा निवडून येणारे आमदार अमीन पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची जोरदार चर्चा होती. त्याऐवजी शेख यांचा समावेश झाल्याने नाराज गट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचे समजते.गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अस्लम शेख भाजप किंवा शिवसेनेत जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र भाजपमध्ये त्यांना प्रवेश व तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अखेर दिल्ली दरबारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि काँग्रेसचे तिकीट मिळवले होते.काँग्रेसच्या चौथ्या यादीत त्यांना मालाड येथून तिकीट दिल्याची घोषणा पक्षाने केली. त्यांनी महायुतीचे उमेदवार रमेशसिंग ठाकूर यांचा सुमारे १० हजार मतांनी पराभव केला. आमदार शेख हे १९९७ ते २००२ या काळात समाजवादी पार्टीकडून, तर २००२-२००७ या काळात काँग्रेसकडून नगरसेवक होते. २००९, २०१४ आणि आता २०१९मध्ये ते मालाड पश्चिममधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.

टॅग्स :congressकाँग्रेस