शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? पेन ड्राईव्हचा उल्लेख करत गृहमंत्र्यांनी यादीच वाचली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:09 IST

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते सध्या सातत्यानं पेन ड्राईव्ह आणत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सोपवला. त्यानंतर आज त्यांनी आणखी एक पेन ड्राईव्ह विधानसभेत आणला. फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का, असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत विचारला. राज्य सरकार विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यांच्या आरोपांना वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीसांनी स्टिंग ऑपरेशनचा दावा केला. १२५ तासांचं फुटेज असल्याचं ते म्हणतात. गरज पडल्यास ते आणखी काही पेन ड्राईव्ह आणतील की नाही ते मला माहीत नाही. पण याआधी फडणवीसांनी राज ठाकरेंना एक पेन ड्राईव्ह पाठवला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह आणला. आज दुसरा पेन ड्राईव्ह आणला. फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का, अशी विचारणा वळसे-पाटील यांनी केली.

गिरीश महाजनांचं नाव घेऊन फडणवीसांनी पोलीस, सरकारनं षडयंत्र रचल्याचा आरोप केला. पोलिसांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. पाच वर्ष मी गृहमंत्री होतो. मला पोलिसांचा अभिमान आहे म्हणता आणि प्रत्येक प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावी अशी मागणी करता. म्हणजे ज्या पोलिसांचा अभिमान असल्याचं सांगता, त्याच पोलिसांवर तुम्हाला विश्वास नाही का, असा सवाल गृहमंत्र्यांनी विचारला.

तुम्ही कोणाकोणाचे फोन टॅप केले?पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे कोणाकोणाचे फोन टॅप केले, त्याची यादीच वळसे पाटील यांनी वाचून दाखवली. २०१५ ते २०१९ या कालावधीत नाना पटोले, बच्चू कडू, संजय काकडे, आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले. यातले बरेच नेते तर त्यावेळी भाजपमध्ये होते. खोट्या नावांनी त्यांचे फोन टॅप झाले. विरोधकांचे फोन टॅप करणं कदाचित समजून घेता आलं असतं. पण स्वत:च्या नेत्यांचे फोन टॅप का केले नाही हे समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस