शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Maharashtra Budget : फडणवीसांचं धनगर समाजाला मोठं गिफ्ट, बिनव्याजी मिळणार इतक्या कोटींचे कर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 17:06 IST

Maharashtra Budget : राज्यातील धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याचबरोबर, राज्यातील धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार येणार आहे. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. तसेच, 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी अहमदनगर येथे मुख्यालय असणार आहे. याशिवाय, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी दिला जाणार आहे, असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याचबरोबर, या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा केल्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आता केवळ 1 रुपयांत पीकविमा दिला जाणार आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. आता शेतकऱ्यांवर कोणताच भार राहणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार हप्ता भरणार आहे. यामुळे 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनागोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून राबवली जात होती. मात्र, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना नावाने राज्य सरकारकडून राबविण्यात येईल. त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार आहे. अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBudgetअर्थसंकल्प 2023Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023