शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2022: संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी; स्मृतिदिनीच अजित पवारांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 08:58 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारक दाम्पत्याचे  निवासस्थान म्हणजे पुण्यातील फुलेवाडा. राज्य संरक्षित वारसास्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार यावर्षी  १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे असे स्मारक पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक (ता. शिरुर) व तुळापूर (ता. हवेली) येथे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय अन्य महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा शुक्रवारी स्मृतिदिन होता, त्याचा आवर्जून उल्लेख करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्मृतींना वंदन करून अर्थसंकल्प सादर करत असल्याचे सुरुवातीलाच सांगितले. 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारक दाम्पत्याचे  निवासस्थान म्हणजे पुण्यातील फुलेवाडा. राज्य संरक्षित वारसास्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार यावर्षी  १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी शंभरावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करणार आहोत. त्यानिमित्ताने राज्यात विविध  कार्यक्रम आयोजित केले जातील. कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या  मौजे पाल खुर्द (ता. वेल्हे, जि. पुणे) येथील  छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या स्मृतिस्थान परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. 

सामाजिक प्रबोधनकार श्री संत जगनाडे महाराज यांचे समाधीस्थळ असलेले पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे (ता.मावळ) या क्षेत्राला तीर्थक्षेत्र  व पर्यटन स्थळाचा दर्जा आहे. श्री संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा विकास आणि परिसरातील सौंदर्यीकरणासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२Ajit Pawarअजित पवार