शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बजेट 2019: मंगल देशा... स्मारकांच्याही देशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:49 IST

समाजपुरुषांच्या नावे स्मारकांची उभारणी, ऐतिहासिक वास्तू विकासासाठी कोट्यवधी रुपये

मुंबई : ‘भारत जमीन का टुकडा नही, जीता जागता राष्ट्रपुरुष है, हम जीयेंगे तो इसके लिये, मरेंगे तो इसके लिये... असे सांगत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात समाजपुरुषांच्या नावे स्मारकांची उभारणी, ऐतिहासिक वास्तू विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले.महाराजा प्रतिष्ठान आंबेगाव (जि.पुणे) येथे शिवसृष्टी निर्मितीसाठी ५० कोटींची तरतूद आहे. किल्ले रायगडच्या विकासासाठी ६०६ कोटी रुपयांची योजना असून त्यावर आतापर्यंत ५९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुतळा नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात व दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत उभारण्यात येईल. स्वातंत्र्य युद्धात पराक्रम गाजवणारे क्रांतिकारक खाजाजी नाईक यांचे स्मारक धरणगाव, जि. जळगाव, ज्येष्ठ रंगकर्मी दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, शिवरामराजे भोसले यांचे स्मारक सावंतवाडी येथे, वीर भागोजी नाईक यांचे स्मारक नांदुरशिंगोटे जि. नाशिक येथे, वीर नाग्या कातकरी यांचे स्मारक चिरनेर, जि. रायगड येथे, वीर बाबुराव शेडमाके यांचे स्मारक घोट जि. गडचिरोली येथे, जंगल सत्याग्रहातील शंभर जनजाती वीरांचे जनकापूर जि. नाशिक, रावलापाणी स्वातंत्र्य लढ्याचे स्मारक नंदुरबारात उभारण्यात येईल. सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या पानशेत; जि. पुणे येथील स्मारकाची दुरूस्ती करण्याचा येईल. या सर्वांसाठी ५० कोटी रुपये ठेवले आहेत.तीर्थक्षेत्रांसाठी १५० कोटी रुपयेतीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यात श्रीक्षेत्र कपिलधारा बीड, श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी (वाशिम), कुणकेश्वर (सिंधुदुर्ग) व आंगणेवाडी (सिंधुदुर्ग), सद्गुरु सखाराम महाराज संस्थान (जळगाव), निवृत्तीनाथ मठ (नाशिक) या तीर्थक्षेत्रातील यात्रेकरुंच्या सोयीकरीता पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019