शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bhushan : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 07:04 IST

आप्पासाहेब यांचा नातू श्रियान याचा बुधवारी व्रतबंध सोहळा रेवदंडा (जि. रायगड) येथे घरी झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.      

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. आप्पासाहेब यांचा नातू श्रियान याचा बुधवारी व्रतबंध सोहळा रेवदंडा (जि. रायगड) येथे घरी झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.          १४ मे १९४६ रोजी जन्म झालेले डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्षे निरुपण करत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठकी सुरू केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे कार्यही केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडे संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जाते. निर्माल्यातून खतनिर्मिती करून पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.

आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर फटाके वाजवून श्री सदस्यांनी आनंद व्यक्त केला. कुटुंबासाठी हा आनंददायी दिवस असल्याची प्रतिक्रिया सचिन धर्माधिकारी यांनी यावेळी दिली. 

पुरस्कार वडिलांच्या चरणी अर्पण शासनाने माझ्या नातवाच्या व्रतबंध दिवशी मला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला, यासारखी भाग्यवान गोष्ट नाही. हे भाग्य माझे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे मिळाले आहे. मला मिळालेला पुरस्कार हा माझे वडील नानासाहेब यांच्या चरणी अर्पण करतो.     - पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी    

ज्येष्ठ निरूपणकार आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेले समाजकार्य तितक्याच समर्थपणे त्यांनी वृद्धिंगत केले. कर्मकांडापेक्षा वृक्ष संवर्धन, जलस्रोत स्वच्छता, ग्राम आणि नगर स्वच्छता, रक्तदान अभियान, आदी समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी महाराष्ट्रभर एक विधायक चळवळ उभी केली. आध्यात्मिक अधिष्ठानातून उभारलेल्या रचनात्मक सत्कर्माचा हा सन्मान आहे असे मी समजतो. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना विशेष धन्यवाद! ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ जीवन गौरव पुरस्काराचे ते मानकरी आहेत याचा आनंद, समाधान आणि अभिमान आहे. लाखो अनुयायांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर धवलकार्य उभारणाऱ्या आप्पासाहेबांचे पुनश्च अभिनंदन !- राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत     

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस