शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Winter Session: मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो! शिवसेना नेते दिवाकर रावतेंची घोषणाबाजी; अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:55 IST

Maharashtra Assembly Winter Session: शिवसेना नेते दिवाकर रावते घोषणा करू लागले; अजित पवारांनी मागे वळून पाहिले

मुंबई: विधिमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली नक्कल, त्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवलेला आक्षेप, त्यावरून सभागृहात झालेला गदारोळ, जाधवांनी मागितलेली माफी अशा घडामोडींनी पहिला दिवस गाजला. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना, बेळगावातील मराठी भाषिकांवर होत असलेले अत्याचार यावरूनही विधिमंडळातलं वातावरण तापलं. 

कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी घटनेचा निषेध नोंदवला. बंगळुरुत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होते. बेळगावात शांतपणे आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांना दडपलं जातं. त्यांच्यावर कारवाई होते. मात्र याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काहीच बोलत नाहीत, असं म्हणत शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

विधानसभेत पुढे बसलेले एकनाथ शिंदे कर्नाटक सरकारचा निषेध करत होते. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि त्याला तिथले मुख्यमंत्री क्षुल्लक घटना म्हणतात, असं शिंदे म्हणाले. तितक्यात शिवसेना आमदार आणि माजी मंत्री दिवाकर रावतेंनी घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, अशी घोषणा रावतेंनी दिली. 

रावतेंच्या घोषणा ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागे वळून पाहिलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणा, अशी सूचना केली. त्यानंतर रावतेंना त्यांची चूक समजली. 'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो', अशी घोषणा मग रावतेंनी दिली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे