शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“देवेंद्र फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप जगासमोर सिद्ध करू शकलो”: उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 17:01 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही कायम दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच सर्वपक्षी नेते आता प्रचारसंभाचा धडाका सुरू करणार असल्याचे सांगिले जात आहे. देवेंद्र फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप जगासमोर सिद्ध करू शकलो, असे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. 

निर्णायक नेतृत्व हे भाजपाचे वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही कायम दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. मी भाजपामध्ये नसतानाही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या विषयात माझ्या सूचनांवर नेहमीच तात्काळ आणि योग्य निर्णय घेतले. राष्ट्रप्रथम ही मानसिकता असलेले नेतृत्व ज्यावेळी सत्तेत असते तेव्हाच अशी निर्णय क्षमता दिसून येते, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचे पाप जगासमोर सिद्ध करू शकलो

नोकरशाही काहीशी गोंधळलेली असताना देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायकतेमुळे आपण काही गोष्टी सिद्ध करू शकलो. ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी डेव्हिड हेडलेला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे कसाबला फाशी होऊन २६/११ च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचे षड्यंत्र असल्याची जी बाब आपण जगाच्या वेशीवर टांगू शकलो नव्हतो. ती त्यांच्या काळात न्यायालयात व्यवस्थित सिद्ध करून पाकिस्तानचे पाप आपण जगासमोर निर्विवादपणे उघड करू शकलो, असे उज्ज्वल निकम यांनी नमूद केले. भाजपा नेते विनय सहस्रबुद्धे यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.  

 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस