शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पावसाळी अधिवेशनाची तारीख बदलली; आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:29 IST

Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशन आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या सकाळी ११ वाजता  मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, आधी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र, आता या अधिवेशनाची तारीख बदलली आहे.   विशेष म्हणजे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारानंतर मंत्र्यांना आपले कामकाज समजून घेण्यासाठी जवळपास चार दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे या अधिवेशनाची तारीख बदलल्याचे म्हटले जाते. यानुसार राज्याच्या विधीमंडळाचे आगामी अधिवेशन १७ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत असल्याची शक्यता वर्तविली जाते. दरम्यान, अधिवेशनच्या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात येतील आणि या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य असणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात नवे सरकार स्थापण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने विरोधक टीका करीत आहेत. तसेच, अधिवेशन कधी होणार याबाबत ही विचारणा केली जात होती. परंतु पावसाळी अधिवेशन आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या सकाळी ११ वाजता  मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 

पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यतामंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आत्तापर्यंत विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत कायम दिसत असल्याने त्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होती. आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळात विस्तारात नेमकं मंत्रिपद कोणाला मिळणार? याकडे देखील लक्ष लागले आहे. याशिवाय, यानंतर होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता देखील अधिक आहे.

उद्या शपथविधी होणारउद्या सकाळी ११ वाजता राजभवन येथे शपथविधी होणार आहे. शिंदे गटातील ६ ते ७ आमदार उद्या शपथ घेतील, अशी शक्यता आहे. तर भाजपाचे ११ जण उद्या मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता राज्याच्या मंत्रिमंडळात असावा, अशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र