शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:10 IST

निवडणूक तयारीचा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा

मुंबई : अन्य कोणत्याही मशीनप्रमाणे ईव्हीएममध्येसुद्धा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मात्र, ईव्हीएम हॅक करणे किंवा त्यात छेडछाड करणे अशक्य आहे. मतपत्रिकेवरील मतदान हा इतिहास झाला असून ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आज केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाने आज दिवसभर सह्याद्री अतिथीगृहात विविध राजकीय पक्ष, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह निवडणुकीशी संबंधित विविध यंत्रणांच्या अधिकारी, प्रतिनिधींशी चर्चा केली. दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनिल अरोरा म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली. मात्र, मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. मतदान ईव्हीएमद्वारेच होणार असल्याचे आयोगाने संबंधित राजकीय पक्षांना सांगितले आहे. अन्य कोणत्याही मशीनप्रमाणे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. मात्र ईव्हीएम हॅक करणे अथवा त्याच्याशी छेडछाड निव्वळ अशक्य आहे. वयाबाबतच्या शंकाचे आयोगाने निरसन केले आहे. तांत्रिक बिघाडांचे प्रमाणही अगदीच नगण्य असून तातडीने पर्यायी व्यवस्थाही केली जाते. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात येत असल्याचे अरोरा यांनी स्पष्ट केले.पहिल्या किंवा त्यावरील मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत, अशी आग्रही मागणी राजकीय पक्षांनी बैठकीत केली. महाराष्ट्रातील अशा प्रकारची सुमारे ५३०० मतदान केंद्रे तळमजल्यावर आली आहेत. जी काही थोडीफार आहेत, तिथे लिफ्टची सुविधा असल्याचे राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आम्हाला सांगितले आहे. तरीही अशा ठिकाणी लिफ्ट सुस्थितीत ठेवत तसे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी स्पष्ट केले.यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष टपाल तिकीट आणि पाकिटाचे अनावरण करण्यात आले. कॉफी टेबल पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे लिखित 'निवडणूक प्रक्रियेचे नियम व कायदे' या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.    

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीनVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग