शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी ११ नंतर भरलेले उमेदवारी अर्ज का नाकारले? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 12:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले, याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी दिले. 

 मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ११ वाजल्यानंतर अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले, याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सोमवारी दिले. 

न्या. आरिफ डॉक्टर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला ज्या उमेदवारांचे अर्ज ३० ऑक्टोबरला सकाळी ११ नंतर नाकारण्यात आले त्यांची यादी सादर करण्याचे निर्देशही दिले. ३० ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराने वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी सकाळी ११  नंतर अर्ज दाखल केल्याने  निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला. त्याविरोधात संबंधित उमेदवाराने  उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने कोणते प्रश्न उपस्थित केले? सकाळी ११ नंतर दाखल केलेले प्रत्येक अर्ज नाकारण्याच्या निर्णयाबद्दल निवडणूक आयोगाकडे उच्च न्यायालयाने विचारणा केली. कामकाजाची वेळ ११ वाजल्यापासून सुरू होत असताना ११ वाजता अंतिम मुदत कशी काय ठेवली? अंतिम मुदत १२ किंवा १ वाजता का नाही ठेवली? कशाच्या आधारावर ११ वाजता अंतिम मुदत ठेवली? अशी विचारणा न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे केली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काय?सकाळी ११ नंतर अर्ज भरल्यामुळे निवडणूक अधिकारी अर्ज फेटाळू शकत नाही. कामकाजाच्या तासांच्या आत अर्ज भरले जाणे आवश्यक आहे. सकाळी ११ वाजता अंतिम मुदत निश्चित करण्यास कोणताही आधार नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.निवडणूक आयुक्तांनी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशितपत्रांची छाननी सुरू करण्याचा स्थायी आदेश दिला होता. त्यामुळे मुदतीबाहेर दाखल करण्यात आलेले अर्ज नाकारण्यात आले, असा युक्तिवाद निवडणूक आयोगातर्फे ऍड. अक्षय शिंदे यांनी न्यायालयात केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४High Courtउच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग