शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 08:04 IST

Maharashtra Assembly Election 2024 : जरांगे पाटील यांनी आरक्षित जागेवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे आणि गरजेनुसार पाडापाडी करण्याची भूमिका घेत दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील इच्छुकांशी संवादही साधला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि इच्छुक उमेदवारांशी साधलेला संवाद पाहता, शिंदेसेनेच्या नेतेमंडळींसह इतर विविध पक्षांतील नेत्यांची पावले अंतरवाली सराटीकडे वळली आहेत. मंत्री उदय सामंत, खा. संदीपान भुमरे, मंगेश चिवटे यांच्यासह छत्रपती संभाजीराजे, अनिल गोटे, राजरत्न आंबेडकर यांनी शनिवारी जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

जरांगे पाटील यांनी आरक्षित जागेवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे आणि गरजेनुसार पाडापाडी करण्याची भूमिका घेत दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील इच्छुकांशी संवादही साधला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगेंना सोबत घेऊन तिसरी आघाडी, चौथी आघाडी करण्यासाठीही अनेकांनी जोर लावला आहे.

उमेदवारांचा निर्णय बुधवारीजरांगे पाटील यांनी राखीव प्रवर्गातील इच्छुकांशी शनिवारी सहा तास चर्चा केली. एका जातीवर निवडणूक होणे शक्य नाही. त्यामुळे मराठा समाजासह मुस्लिम आणि मागासवर्गीय समाज एक होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारांबाबतचा निर्णय ३० ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचाराला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिले आहे. सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. आपण वेगळे लढलो तर समाजात वेगळा मेसेज जाईल. आपण एकसंध कसे राहू शकतो, यासह इतर मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा. निवडणुकीत दोन्ही उमेदवार समोरासमोर येणं योग्य वाटत नाही.- संभाजीराजे छत्रपती

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक