शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पवार कुटुंबीयांची एकत्र भाऊबीज झाली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:12 IST

Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२३ मध्ये पवार कुटुंबाचे दिवाळी सेलिब्रेशन एकत्रित झाले होते. मात्र, यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पवार विरुद्ध पवार लढतीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांची राजकीय आणि काैटुंबिक गणिते बदलली आहेत.

 बारामती -  राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२३ मध्ये पवार कुटुंबाचे दिवाळी सेलिब्रेशन एकत्रित झाले होते. मात्र, यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पवार विरुद्ध पवार लढतीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांची राजकीय आणि काैटुंबिक गणिते बदलली आहेत. यंदा प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाशिवाय पवार कुटुंबियांचा पाडवा आणि भाऊबीज साजरी झाल्याचे चित्र आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला यंदा अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे शरद पवार आणि प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार व अन्य कुटुंबियांच्या उपस्थितीत दिवाळी सण साजरा झाला. 

यंदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाऊबीजही साजरी झाली नाही. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या भगिनींनी रविवारी बारामती येथील आपल्या निवासस्थानी बंधू राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, जयंत पवार व अभिजित पवार यांना औक्षण करत कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी केली. तसेच, बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरलेले त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचेही कुटुंबातील बहिणींनी औक्षण करीत भाऊबीज साजरी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारFamilyपरिवारDiwaliदिवाळी 2024