शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"नितीन गडकरी चांगले नेते, पण देवाभाऊ..."; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:17 IST

Maharashtra Assembly Election 2024 : गडकरी चांगले नेते आहेत. पण, देवाभाऊ कॉपी करून पास झाला, दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला. एवढेच नाही, तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असेही सुळे यांनी म्हटले आहे.

राज्यात निवडणुकीकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी नेतेमंडळी एकमेकांवर आरोपो प्रत्यारोप करतानाही  दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांचे कौतुक करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. गडकरी चांगले नेते आहेत. पण, देवाभाऊ कॉपी करून पास झाला, दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला. एवढेच नाही, तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असेही सुळे यांनी म्हटले आहे. त्या चांदवड येथे एका प्रचारसभेत बोलत होत्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देवाभाऊ एका भाषणात म्हणाले की, 'हो, मी उपमुख्यमंत्री झालो, पण दोन पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो.' मला आश्चर्यच वाटलं. म्हटलं देवाभाऊ, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. कारण, माझ्या देवाभाऊंकडून फार अपेक्षा होत्या." 

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "अरे, विरोधात असला म्हणून काय झालं? चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते, कारण की गडकरी साहेब चांगलेच आहेत. चांगल्याला चांगलेच म्हणायला हवे. विरोधक असला म्हणून काय झालं? गडकरी साहेब चांगले, पण प्रॉब्लेम गडकरी साहेबांचा नाही, प्रॉब्लेम पक्षाचा आहे." एवढेच नाही तर, "गडकरी साहेब चांगले आहेत तर मला वाटलं देवाभाऊ पण चांगला असेल. नंतर ध्यानात आलं की देवाभाऊ कॉपी करून पास झाला, दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी