शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दीड टक्के मते वाढवा, विधानसभा आपलीच; देवेंद्र फडणवीसांनी दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 07:24 IST

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत अपयश आले, याचा अर्थ विधानसभा गेली, असा कोणीही काढू नका, लोकसभेतील आकडेवारीच सांगते की, केवळ दीड-दोन टक्के मते वाढविली की, आपला विजय नक्की आहे, त्यादृष्टीने कामाला लागा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत अपयश आले, याचा अर्थ विधानसभा गेली, असा कोणीही काढू नका, लोकसभेतील आकडेवारीच सांगते की, केवळ दीड-दोन टक्के मते वाढविली की, आपला विजय नक्की आहे, त्यादृष्टीने कामाला लागा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपचे पदाधिकारी, आमदार, खासदार, पराभूत उमेदवार यांना दिले. तर, लोकसभेत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.

लोकसभेतील पराभवानंतर भाजपच्या चार बैठका शुक्रवारी येथे झाल्या. यावेळी फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या याचा अर्थ विधानसभेच्या १८६ जागांवर ते पुढे आहेत, असा अजिबात नाही. जवळपास ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण फक्त ३ ते ५ हजारांनी मागे आहोत. हार पचविण्याची सवय तुटल्याने नैराश्य आले, पण ते झटकून कामाला लागा.या बैठकीस विनोद तावडे, शिवप्रकाश, राज्यातील मंत्री, नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्रिपद सोडण्याचे संकेतसरकारच्या बाहेर राहूनच पक्षकार्य करता येते, असे म्हणत फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा विचार मागे घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले.

आपला लढा फेक नरेटिव्हविरोधातलोकसभा निवडणुकीत आपल्याबाबत बुद्धिभेद (फेक नरेटिव्ह) करण्यात आला, त्याचा फटका आपल्याला बसला. आता प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपविरोधातील नरेटिव्ह आला रे आला की, त्याचे जोरदार प्रत्युत्तर देण्याची मुभा आहे, असे फडणवीस यांनी जाहीर केले. प्रत्युत्तर देताना ते अंगलट येणार नाही एवढीच काळजी घ्या, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल