शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस-उद्धव यांच्या सर्वाधिक सभा,तर पवारांनी गाजवले मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 13:24 IST

गेली चार आठवडे महराष्ट्रात प्रचाराची धामधूम अनुभवायला मिळाली

मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी दुपारी ३ वाजता शांत झाली. त्यामुळे आता कुणालाच जाहीर सभा घेता येणार नाही. तर गेली चार आठवडे महराष्ट्रात प्रचाराची धामधूम अनुभवायला मिळाली. युती आणि महाआघडीच्या नेत्यांनी मैदान गाजवलं तर मनसे प्रमुख राज ठाकरेंसुद्धा प्रचाराच्या आखाड्यात उतरले असल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या २८ दिवसांच्या काळात सर्वच राजकीय पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या राज्यभर सभा पार पडल्या. भाजपच्या वतीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर सभा घेतल्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरे हे सुद्धा प्रचाराच्या आखाड्यात उतरले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर व मनसेचे राज ठाकरे यांनी सुद्धा विविध मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर सभा घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकूण ९ सभा घेतल्या, तर अमित शहा यांनी २१ सभा आणि १ ठिकाणी रोड शो केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ४८ सभा, ३ रोड शो व १ माँर्निंग वॉक केला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ४८ सभा विविध मतदारसंघात घेतल्याचे पाहायला मिळाले. तर शेवटच्या टप्यात साताऱ्यातील चर्चेची ठरलेली सभा मिळवून शरद पवारांनी एकूण ४३ सभा घेतल्या.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकूण ४६ सभा घेतल्या. तर एमआयचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी २५ ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. त्याचप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २० सभा घेतल्या. तर प्रचाराची धामधूम जरी संपली असली तरीही उमेदवारांची धाकधूक कायम आहे.